*फॅबटेक मध्ये शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी ‘व्यावसायिक उत्कृष्टता प्रशिक्षण’ कार्यक्रम संपन्न*

सांगोला: येथील फॅबटेक एज्युकेशन सोसायटी संचलित,फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅड रिसर्च, सांगोला येथे शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी ‘व्यावसायिक उत्कृष्टता प्रशिक्षण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमता वाढीस चालना देणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग शिकवणे आणि त्यांच्या व्यावसायिक कौशल्यांचा विकास करणे हा होता.
कार्यक्रमात किरण परांडेकर यांनी कार्यस्थळी शिस्त, वेळेचे व्यवस्थापन, संघटन कौशल्य आणि प्रभावी संवाद यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच, कार्यशाळा व संवाद सत्रांच्या माध्यमातून कर्मचार्यांना त्यांच्या दैनंदिन कामकाजात उपयुक्त ठरणाऱ्या तंत्रज्ञान आणि आधुनिक पद्धती शिकवण्यात आल्या.
संस्थेच्या विकासात अशिक्षकीय कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे,त्यांचा सातत्याने विकास घडवण्यासाठी अशा प्रशिक्षण उपक्रमांची नितांत गरज असल्याचे फॅबटेक संस्थेचे चेअरमन मा.श्री.भाऊसाहेब रुपनर यांनी उद्घाटनप्रसंगी बोलताना सांगितले.
हा कार्यक्रम फॅबटेक एज्युकेशन सोसायटी संस्थेचे चेअरमन मा.श्री.भाऊसाहेब रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ .संजय अदाटे , फार्मसी कॉलेज चे ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा.चेतन पतंगे , कार्यालय अधीक्षक श्री.राजेंद्र पाटील, फार्मची कॉलेज चे कार्यालय अधीक्षक श्री. विनायक बंडगर सर ,पब्लिक स्कूल च्या कार्यालय अधीक्षक वर्षा कोळेकर यांच्या उपस्थितीत व फॅबटेक एज्युकेशन सोसायटी संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर, व्यवस्थापकीय प्रतिनिधी प्राजक्ता रूपनर , कार्यकारी संचालक मा.श्री.दिनेश रूपनर, प्राचार्य डॉ. रविंद्र शेंडगे, उप प्राचार्य प्रा.डॉ विद्याराणी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
या कार्यक्रमाला फॅबटेक एज्युकेशन सोसायटी संस्थेतील सर्व अशिक्षकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहभागींनी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याची प्रतिक्रिया दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.शरद आदलिंगे यांनी मानले.