कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे वतीने ग्रंथमिञ गुलाबराव पाटील यांचा सत्कार संपन्न

सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे विद्यमान अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे निमंञित सदस्य ,पुणे विभाग ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष ग्रंथमिञ गुलाबराव पाटील यांना कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे वतीने जिल्हाअध्यक्ष ग्रंथमिञ तानाजी मगदुम यांच्या हस्ते मानाचा फेटा व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
पाटील हे ग्रंथालय चळवळीत अग्रेसर व कार्यरत असणारे नेतृत्व असून पेशाने ते प्राथमिक शिक्षक असून त्यांची सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सोसायटीवर संचालक पदी निवड झाली आहे यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ग्रंथमिञ मधुकर सुतार ,जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह आर एस पाटील ,सांगोला तालूका ग्रंथालय संघाचे सहसचिव संजय सरगर ,दत्ताञय पाटील ,शरद कोळवले ,अमर कुलकर्णी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे कोषाध्यक्ष भिमराव पाटील यांनी मांडले.



