सांगोला तालुकाक्राईम

जनावर चोरीमुळे शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात

हलदहिवडी येथे चोरी

 

HTML img Tag Simply Easy Learning    

सांगोला (प्रतिनिधी) – अज्ञात चोरट्याने घरासमोर बांधलेली 16 हजार रुपये किमतीच्या  2 शेळ्या चोरून नेल्याची घटना रविवार दि. ५ नोव्हेंबर रोजी हलदहिवडी ता.सांगोला येथे घडली आहे.

नवनाथ पवार रा. हलदहिवडी यांनी शुक्रवार दिं.४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याचे सुमारास घरासमोर शेवग्याच्या झाडास दोन शेळ्या बांधल्या होत्या. शनिवार दिनांक ५ नोव्हेंबर रोजी नवनाथ पवार हे मध्यरात्री दोन वाजण्याच्या  सुमारास घराबाहेर आले असता दोन्हीही शेळ्या बांधलेल्या ठिकाणी होत्या. दरम्यान 5 नोव्हेंबर रोजी पहाटे 6 वाजता दोन्ही शेळ्या गायब असल्याचे निदर्शनास आले, त्यांनी गायब असलेल्या शेळ्याची शोधाशोध केली पण मिळून आल्या नाहीत. याबाबत नवनाथ पवार यांनी अज्ञात चोरट्याने 16 हजार रुपये किमतीच्या २ शेळी चोरून नेल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!