राजापूर जि प शाळेत डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत.

सांगोला तालुक्यातील राजापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोडकरी वस्ती या शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे गुलाब पुष्प पुस्तके देऊन शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी स्वागत केले यावेळी सर्व शिक्षक नेते मंडळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉक्टर बाबासाहेब देशमुख म्हणाले जिल्हा परिषद शाळेत पहिल्याच दिवशी मुलांचे मुलींचे स्वागत करायला मिळाले संधी मिळाली समाधान वाटले तालुक्यातील सर्वच शाळेचा दर्जा आणि शिक्षण अतिशय चांगले आहे. स्वत: जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिक्षण घेतले. याच शाळेने आपल्याला सत्यासाठी लढण्याची शिकवण दिली. शिक्षणाने आपण चांगले व्यक्ती बनतो. शिक्षण आपल्या चालण्यातून, वागण्यातून, बोलण्यातून दिसायला हवा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणासोबतच संस्कार होतात, ही अभिमानाची बाब असुन सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्रासाठी शुभेच्छा देतो असे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी शेवटी सांगितले.
राजापूर ग्रामपंचायत डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा शाल श्रीफळ फेटा देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास चेअरमन चंद्रकांत पाटील,पोलीस पाटील दुर्योधन गायकवाड, मेजर अमर तोडकरी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष समाधान राजमाने, सरपंच सौ मुक्ता कदम, सुखदेव कदम गुरुजी, माजी चेअरमन राजाराम पाटील, चेअरमन किरण तोडकरी, युवा नेते विशाल पाटील, मुख्याध्यापक भोजने गुरुजी, श्री पाटील गुरुजी, सुभाष खबाले, रेवन तोडकरी, कोठावळे गुरुजी, ढोले मॅडम, दत्ता पुजारी यांच्यासह सर्व ग्रामस्थ शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.