सांगोला तालुकाशैक्षणिक

न्यू इंग्लिश स्कूलचा निसर्ग फुले मंथन परिक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम

.सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल या नामांकित प्रशालेतील इयत्ता पाचवी मधील निसर्ग चैतन्य फुले याने राज्यपातळीवर घेतल्या जाणाऱ्या मंथन  राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेमध्ये ३०० पैकी २९८ मार्क मिळवून महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त करून, न्यू इंग्लिश स्कूल च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

याप्रसंगी त्याचा व त्याच्या पालकांचा सत्कार न्यू इंग्लिश स्कूल चे प्राचार्य प्रा.नामदेव कोळेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक प्रा.डॅा.अशोकराव शिंदे,प्रा.दिपकराव खटकाळे,पर्यवेक्षक तानाजी सूर्यगंध,जेष्ठ शिक्षक हरिदास भोसले सर आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शक शिक्षक निलोफर मुजावर मॅडम, सौ.कविता शिंदे मॅडम, श्रीयुत दिनेश बागुल सर, श्रीयुत किरण पवार सर यांचाही सन्मान करण्यात आला.

सदरच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किरण पवार सर यांनी केले तर आभार चैतन्य फुले सर यांनी मानले.त्याच्या या यशाबद्दल सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विठ्ठलराव शिंदे सर, संस्थासंचालक डॅा.अनिकेत देशमुख डॉ.अशोकराव शिंदे,प्रा.दीपकराव खटकाळे व प्रा.जयंतराव जानकर, यांनी त्याचे अभिनंदन करून त्याच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!