नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये रंगोत्सव सेलिब्रेशन मार्फत घेण्यात आलेल्या सेकंड लेव्हल एक्झाम मध्ये नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मेडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी मिळवली आकर्षक बक्षिसे*

नाझरा(वार्ताहर):-नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये आज रंगोत्सव सेलिब्रेशन मार्फत सेकंड लेव्हल एक्झाम मध्ये नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मेडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांना अमृत शेर गिल अवॉर्ड -1 इंटरनॅशनल आर्ट मेरिट अवॉर्ड-1 इंटरनॅशनल मेडल-8 तसेच कनसुलेशन प्राईज- 2 तसेच आकर्षक बक्षिसे मिळवली.या पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाची सुरुवात कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके व बाईसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी ना झरा विद्यामंदिर प्रशाला चे मुख्याध्यापक. श्री . अमोल गायकवाड सर , नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मेडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका कु. मंगल पाटील मॅडम तसेच पालक माननीय श्री .ज्ञानेश्वर आदाटे सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मेडियम स्कूलचे कलाशिक्षक श्री. अश्वजीत जाधव सर यांना साल्वदर दाली अवॉर्ड त्याच प्रमाणे मुख्याध्यापिका कु. मंगल पाटील मॅडम यांना परफॉर्मर अवॉर्ड तसेच नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मेडियम स्कूल साठी ग्लोबल स्कूल अवॉर्ड मिळाला. पारितोषिक वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. ऐश्वर्या रणपिसे मॅडम यांनी केले तसेच आभार कु. आम्रपाली गडहिरे मॅडम यांनी मांडले . तसेच कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.