राजकीयमहाराष्ट्रसांगोला तालुका

शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देणार – आमदार शहाजीबापू पाटील

 

सांगोला (प्रतिनिधी): २०१९ ची विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर सांगोल्यात शेतकरी कामगार पक्षाला मोठी गळती लागली आहे, एक-एक करत अनेक नेते, पदाधिकारी कार्यकर्ते शेकापला अखेरचा लाल सलाम करीत शिवसेनेत गेले आहेत. त्यातच आता लोकसभेच्या तोंडावर शेकापला आणखी एक जोरदार धक्का बसला आहे. पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इटकी गावातील खांडेकर वस्ती, गीते वस्ती, कर्चे वस्ती, सावंत वस्ती येथील बहुसंख्य शेकाप कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने शेकापला खिंडार पडले आहे. शेकापला अखेरचा लाल सलाम करून शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना पक्षात सन्मानाची वागणूक दिली जाईल. कोणावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.

२०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर शेकापच्या नेतृत्वावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा विश्वास नसल्याने
शेकाप मधील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शेकापला अखेरचा लाल सलाम करीत पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला आहे. ईटकी गावातील विद्यमान उपसरपंच दत्तात्रय गीते, दत्तात्रय करचे, बाबुराव गीते, किसन काळेल, वसंत चव्हाण, किसन चव्हाण, नवनाथ गीते, संकेत गळवे, भारत कर्चे, तुकाराम खांडेकर, रामभाऊ खांडेकर, दुर्योधन खांडेकर, धर्मराज गळवे, महेश सावंत, सचिन गीते, बबलू सावंत, प्रीतम गीते, लक्ष्मण कर्चे, शरद सावंत, रखमाजी करचे, नामदेव निकम, बबन चव्हाण, मल्हारी चव्हाण, माजी पोलीस अधिकारी नामदेव खांडेकर या शेकापच्या कार्यकर्त्यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला.

 

 

स्थानिक पातळीवर शिवसेनेमध्ये मोठ्या संख्येने इनकमिंग सुरु झाली आहे.
यावेळी बोलताना आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले, शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता माझ्यासाठी महत्वाचा आहे. सध्या परिवर्तनाची लाट आहे. गोरगरिबांच्या कल्याणासाठी माझी धडपड सुरू असून तालुक्याचा विकास हेच ध्येय उराशी बाळगून माझी वाटचाल सुरू आहे. गेल्या पाच वर्षांपासून सांगोला तालुक्यात विकासाची गंगा वाहत असून तालुक्यातील सर्वच गावे सिंचनाखाली आली आहेत. उजनीचं पाणी सर्वांच्या शेतात पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे. तालुक्यातील ५० हजार तरुणांना रोजगार मिळेल इतकी मोठी एमआयडीसी उभा करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. शेकापला अखेरचा लाल सलाम करून शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देणार असल्याचा विश्वास आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिला.

 

यावेळी शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर, शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे, विजय मरगर, संजय मेटकरी, सुरेश कदम, खवासपूरचे माजी सरपंच लक्ष्मण भोसले, महिमचे सरपंच नारनवर, बाळासाहेब भोसले, सतीश पाटील, हरिभाऊ जरे, नवनाथ येडगे, प्रमोद हुबाले, नितीन सातपुते, माणिक निकम, संजय सावंत, संजय पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश तांबवे यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!