पंतप्रधान नरेंद्र मोदीच तिसऱ्यांदा ही पंतप्रधान होणार असल्याने माढ्याचे खासदार रणजीत सिंह निंबाळकरानां ही मिळणार केंद्रात संधी- श्रीकांत दादा देशमुख
श्रीकांत दादा देशमुख यांचा आलेगाव गावात संवाद दौरा व कॉर्नर सभेचे आयोजन

सोलापूर जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीचे विद्यमान सदस्य व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी बिनविरोध सदस्य श्रीकांत दादा देशमुख यांचा सांगोला तालुक्यातील आलेगाव मध्ये जनसंवाद दौरा व कॉर्नर सभेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते
गावात आगमन होताच हलगी वाद्य व फटाक्याच्या आतषबाजीने स्वागत करण्यात आले. ग्रामदैवत सिद्धनाथाचे दर्शन घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली श्रीकांत दादा सोबत या दौऱ्यात भाजपा जिल्हा ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष विलास भाऊ गावडे भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सतीश कांबळे भाजपा जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष चंद्रकांत बापू कावळे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे भिवाजी वाघमारे भाजपा अल्पसंख्यांक जिल्हा मोर्चाची सचिव शकील बागवान इत्यादी उपस्थित होते
श्रीकांत दादा देशमुख व मान्यवरांचा सत्कार आलेगावचे तंटामुक्त समिती अध्यक्ष तात्यासाहेब बाबर माजी ग्रामपंचायत सदस्य सुधाकर तात्या बाबर नवनाथ यादव एकनाथ बाबर डॉक्टर अभिजीत बाबर सचिन कांबळे पिंटू जाधव यांनी केला तर प्रास्ताविक नंदकुमार बाबर यांनी केले गावातील ग्रामस्थांनी समस्या व अडचणी मांडल्या त्या सोडवण्याचे पूर्ण करण्याचे आश्वासन श्रीकांत दादा यांनी दिले मान्यवराची मनोगते झाल्यानंतर श्रीकांत दादा देशमुख यांनी संवाद दौरा व कॉर्नर सभेचे आयोजनाबद्दल माहिती दिली लोकसभा माढा मतदारसंघाचे पहिल्या यादीत अधिकृत जाहीर झालेले भाजपा महायुतीने उमेदवार खासदार रणजीत सिंह निंबाळकर यांच्या पाच वर्षाच्या कामाचा आढावा सविस्तर सांगितला व केंद्राच्या भाजपाच्या नरेंद्र मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात पंतप्रधान काळात ज्या दीडशे लोकोपयोगी गोरगरीब लाभार्थीच्या व देशाच्या या माढा भागाच्या विकासाच्या राबवलेल्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्या यादृष्टीने व समजून सांगण्याच्या दृष्टीने या जनसंवाद दौरा व कॉर्नर सभेचे आयोजन केलेले आहे मोफत घर शौचालय मोफत गॅस मोफत अन्नधान्य पाणी मोफत औषधोपचार अल्पभूधारक शेतकऱ्यांना अनुदान मुद्रा लोन योजना मोफत व्यवसाय प्रशिक्षण अशा अनेक केंद्राच्या योजनांची सविस्तर माहिती आपल्या मार्गदर्शनात दिली पाच वर्षात खासदार रणजितसिंह निंबाळकरांनी तालुक्याच्या व मतदार संघाच्या शेतीच्या पाण्याच्या योजना पूर्णत्वास नेल्या तालुक्यातील व मतदार संघातील रस्ते पंतप्रधान ग्राम सडक योजना व पंतप्रधान सडक योजनेने जोडले तसेच खासदार फंड डीपीसी फंड 25 15 चा फंड माढा लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या 1100 च्या वर गावांना देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा व राज्याचे भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या यादीत माढा लोकसभा मतदारसंघाची अधिकृत उमेदवारी दिली देशांमध्ये 25 कोटी कुटुंबाची गरिबीची दारिद्र रेषा ओलांडण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना यश आल्याने ते तिसऱ्यांदा निवडून येऊन पंतप्रधान होणार आहेतच त्याबरोबर आपण याच प्रवाहात माढ्याचे खासदार म्हणून रणजीत सिंह निंबाळकरांना निवडून दिल्यास त्यांनाही देवेंद्र फडणवीसांचाया जवळीकतेमुळे व दिल्लीच्या वरिष्ठा सोबतच्या वावरामुळे केंद्राच्या मंत्रिमंडळात संधी मिळू शकते म्हणून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत रणजीत सिंह निंबाळकरांच्या भाजपा पक्षाच्या कमळ चिन्ह समोरील बटन दाबून विक्रमी मताधिक्याने त्यांना निवडून द्या असे कळकळीचे आवाहन केले
ही कॉर्नर सभा यशस्वी करण्यासाठी राजेंद्र बाबर हरिभाऊ वाळके राजेंद्र रामचंद्र बाबर विठ्ठल दिवसे उमेश पवार लक्ष्मण बाबर अशोक बाबर नारायण दिवसे चंद्रकांत बाबर दत्ता माळी विठ्ठल काळे वसंत लवटे बबन गडहिरे धनाजी मोरे रत्नाकर जाधव भीमराव बाबर लक्ष्मण यादव राजेंद्र वायदंडे पप्पू बाबर बाळासाहेब बाबर रमेश कांबळे एकनाथ शिवाजी बाबर शिवाजी बनसोडे यांनी परिश्रम घेतले विठ्ठल दिवसे यांनी आभार मानले.