महाराष्ट्र
नाझरा विद्या मंदिर मध्ये जागतिक वनदिन व जलदिन साजरा

नाझरा(वार्ताहर):- सध्या उन्हाची तीव्रता जास्त वाढत आहे.आपल्या परिसरात असणाऱ्या अनेक पक्षांना पिण्याच्या पाण्यासाठी सगळीकडे भटकावे लागत आहे. आपल्या घराच्या परिसरात असणाऱ्या झाडांवरती जे पक्षी आहेत त्या पक्षांसाठी आपण पिण्याच्या पाण्याची व अन्नधान्यची सोय करावी असे आवाहन नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य बिबीशन माने यांनी केले.
नाझरा विद्यामंदिर प्रशालेमध्ये चिमणी दिवस व जागतिक वनदिन, व जागतिक जलदिन साजरा करण्यात आला. यावेळी पर्यवेक्षक मधुकर धायगुडे, ज्येष्ठ शिक्षक विनायक पाटील , सामाजिक वनीकरण विभाग सांगोलाचे अधिकारी प्रवीण सिरसागर, मारुती मुंडकर, वनसेवक अनिल शिवशरण, हरित सेना विभाग प्रमुख सोमनाथ सपाटे यांच्या उपस्थित साजरा झाला, त्यानंतर प्रवीण खेडकर यांनी विद्यार्थ्यांना चिमणी जगली पाहिजे, तसेच वृक्षारोपण, व जल संवर्धन व वन्य प्राण्याविषयी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली, उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक एस एस सपाटे यांनी केले.