कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना सलग दुसर्यांदा केंद्रीय गृह मंत्रालयाच्या उत्कृष्ट प्रशासकीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक बहाल करण्यात आले, याबद्दल शहीद जवान संस्थेच्या वतीने साहेबांचा शाल झाडाचे रोप व गोंदवलेकर महाराजांचे प्रवचन पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.
विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी हे सांगोला पोलीस स्टेशनची वार्षिक तपासणी करण्यासाठी आले होते. त्यानिमित्ताने पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर सभागृहात नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. शहीद जवान संस्थेच्यावतीनेही विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनील फुलारी यांचा सत्कार केला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अच्युत फुले, सचिव संतोष महिमकर, संदेश पलसे, इंजि. संतोष भोसले, राजेंद्र यादव आदीनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस आधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक भिमराव खणदाळे,सहायक पोलीस निरीक्षक सचिन जगताप, यांच्यासह पोलीस आधिकारी तसेच कर्मचारी हजर होते..