महाराष्ट्र

मंडल अधिकारी व पोलीस पाटील यांना धक्का बुक्की; एकावर गुन्हा दाखल

सांगोला(प्रतिनिधी):-शासनाच्या परवानगी शिवाय व अनाधिकृतपणे वाळू व मुरुम चोरुन घेवुन जात असताना मंडल अधिकारी व पोलीस पाटील यांना धक्का बुक्की करुन जेसीबी व दोन ट्रक्टर पळवुन घेऊन गेल्यामुळे सरकारी कामात अडथळा आणून आणल्याप्रकरणी एकांवर गुन्हा दाखल झाला असून घटनेची फिर्याद मंडल अधिकारी सौ. विजया महारुद्र नाईक यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे. संभाजी प्रभाकर भोसले रा. धायटी ता. सांगोला जि. सोलापुर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सांगोला पोलीस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशी की, दि. 24/03/2025 रोजी दुपारी 1 वा. चे सुमारास तहसील कार्यालय सांगोला येथे हजर असताना धायटी येथील एका अनोळखी इसमाने फोन करून कळविले की, धायटी येथे अवैध्य रित्या मुरुमचे उत्खणन जे.सी.बी व टॅक्टर च्या साह्याने सुरु आहे, असे कळविल्यावर फिर्यादी व पोलीस पाटील प्रविण गायकवाड हे धायटी येथे गेलो. धायटी येथील वैजयंता पाटील यांचे शेती गटामध्ये अंदाजे 45 ब्रास मुरुम उत्खणन केल्याचे दिसुन आले. यावेळी उत्खनणासाठी वापरण्यात आलेला जेसीबी व 2 ट्रॅक्टर दिसून आले.त्यामध्ये अंदाजे अर्धा ब्रास वाळु व एक ब्रास मुरुम दिसून आला. त्यावेळी प्रभाकर पाटील यांचेकडे मुरुम उत्खणनाचे तहसील कार्यलायाचे परवानगी बाबत विचारले असता त्यांनी परवानगी नसल्याचे सांगितले. मुरुम उत्खणनासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाबाबत विचारता त्यांनी सदरची वाहने ही संभाजी भोसले यांचे मालकीचे असलेचे सांगितले. त्यानंतर वाहन मालक संभाजी भोसले यांना मी तुम्ही अनाधिकृतपणे मुरुम उत्खणन केल्याचे सांगितले असता त्यांनी आरेरावीची भाषा सुरु करुन मला उद्देशून मी वाहने तहसील कार्यालय येथे आणुन लावत नाही, तुम्हाला काय करायचे ते करा असे बोलु लागला. त्यावेळी ट्रॅक्टरचे फोटो काढत असताना संभाजी भोसले याने मला फिर्यादी यांना ढकलुन देवुन पोलीस पाटील प्रविण गायकवाड यांनाही संभाजी भोसले यांनी धक्काबुक्की केली.

 

संभाजी भोसले याचे आडधाडपणामुळे व मनुष्यबळ कमी असल्यामुळे आम्ही तेथुन निघुन आलो. त्यानंतर तहसील कार्यालय सांगोला येथे येवुन सदरचा प्रकार हा तहसीलदार यांना सांगितल्यावर त्यांनी गुन्हा दाखल करण्याचे तोंडी आदेश दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button