दिनदयाळ जन आजीविका योजने अंतर्गत शहर उपजीविका कृती आराखडा समितीची प्राथमिक बैठक मुख्याधिकारी यांचे कक्षामध्ये घेण्यात आली.दीनदयाळ जन आजीविका योजना राबविण्याचे शासन स्तरावर ठरविण्यात आले आहे. या योजनेसाठी शहर उपजीविका कृती आराखडा तयार करण्यासाठी विविध शासकीय विभागांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी होते.
बैठकीच्या सुरुवातीस मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी दीनदयाळ जन आजीविका योजनेंतर्गत शहर उपजीविका कृती आराखडा याबाबत सविस्तर माहिती दिली. या बैठकीमध्ये शहरात बांधकाम कामगार, वाहतूक कामगार, स्वच्छता क्षेत्रात काम करणारे कामगार, गीग वर्कर, केअर वर्कर, घरगुती काम करणारे इ. असंघटीत कामगारां विषयी तसेच रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करण्यासाठी काय उपयोजना करता येतील यावर प्राथमिक चर्चा करण्यात आली. शहरातील विकासापासून वंचित असलेल्या घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी काय करता येऊ शकते. याविषयी आपले सखोल विचार व्यक्त केले.
या बैठकीस नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक सचिन पाडे, डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. संभाजी शिंदे , कामगार कार्यालय प्रतिनिधी उज्ज्वल सूर्यवंशी, पुरवठा निरीक्षक प्रियांका जाधव, कृषी पर्यवेक्षक हणमंत बाबर, आपुलकी प्रतिष्ठान अध्यक्ष राजेंद्र यादव, व्यापारी संघटना प्रतिनिधी आनंद घोगंडे, जेष्ठ नागरिक संघटना अध्यक्षा आशा सलगर, कर्तव्य शहर स्तर संघ अध्यक्षा सुनंदा घोंगडे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ईश्वर फुले, पथविक्रेता प्रतिनिधी रुक्साना बागवान, तन्मय खडतरे व सर्व विभाग प्रमुख इ. सदस्य उपस्थित होते. बैठकीचे प्रस्ताविक सहायक प्रकल्प अधिकारी योगेश गंगाधरे यांनी केले. सदर बैठक यशस्वीतेसाठी समुदाय संघटक बिराप्पा हाक्के, शहर उपजीविका केंद्र व्यवस्थापक शरद थोरात, सहाय्यक जयश्री खडतरे यांनी परिश्रम घेतले.