महाराष्ट्र
सांगोला रोटरी क्लबच्या वतीने जि प प्राथमिक शाळा पाटील वस्ती येथे विद्यार्थ्यांना उन्हाळी टोप्याचे वाटप.

सध्या उन्हाळा तीव्र होत असुन सकाळी १० नंतर बाहेर पडणे अवघड होवुन बसले आहे…उन्हाच्या तीव्रतेमुळे शासनाने शाळेची वेळ सकाळची ठेवली आहे…तरी सुद्धा शाळा सुटल्यावर घरी जाताना विद्यार्थ्यांना भर उन्हातून घरी जावे लागत आहे..सांगोला शहरा नजिक असलेल्या जि प प्राथमिक शाळा पाटील वस्ती येथील सर्व मुलांचे पालक हे शेतकरी,शेतमजुर व कामगार वर्गातील आहेत..विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेवून सांगोला रोटरी क्लबने सर्व विद्यार्थ्यांना उन्हापासून संरक्षण मिळावे म्हणून सर्व विद्यार्थ्याना टोप्या वाटप केल्या..
रो.शरणाप्प हळ्ळीसागर यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम संपन्न झाला..रोटरी क्लबचे अध्यक्ष इंजि.विकास देशपांडे यानी प्रास्ताविक करताना कार्यक्रमाचा हेतू विषद केला..शाळेतील शिक्षिका अक्कलकोटे मैडम व विद्यार्थिनी यानी सर्वांचे स्वागत पुष्पगुच्छ देवुन केले..मुख्याध्यापिका जानकर मॅडम यानी रोटरी क्लब करत असलेल्या सहकार्याब्द्द्ल सर्वांचे आभार मानले..सचिव इंजि.विलास बिले यानी शाळेने दिलेल्या सहकार्याब्द्द्ल कृतज्ञता व्यक्त केली व रो.हळ्ळीसागर याना धन्यवाद दिले..या प्रसंगी रोटरी सद्स्य रो.इंजि.संतोष भोसले,रो.इंजि.अशोक गोडसे,रो.अरविंद डोंबे गुरुजी,रो.प्रा.राजेंद्र ठोंबरे,सुशीला नांगरे पाटील मैडम,रूपाली खडतरे,श्रीकांत पाटील आदि उपस्थित होते..