महाराष्ट्र

फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीत क्षयरोग जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

सांगोला  – फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) अंतर्गत क्षयरोग (TB) जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र, अकोला तालुका संगोला येथील प्रयोगशाळा प्रमुख अधिकारी श्री. संतोष राऊत यांनी मार्गदर्शन केले
.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य श्री. संजय बैस यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले व क्षयरोगाच्या संदर्भात आपले विचार मांडले. त्यांनी या रोगाविषयी जागरूकता वाढवण्याची गरज असल्याचे सांगितले.
प्रमुख वक्ते श्री. संतोष राऊत यांनी क्षयरोग टाळण्यासाठी जनजागृती, लवकर निदान आणि योग्य उपचार यांचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच, रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी सांगितले.डी. फार्मसी विभागाच्या विभागप्रमुख प्रा. ए. बी. झाडे यांनी देखील क्षयरोग जनजागृती व उपचार पद्धती याबाबत आपले विचार मांडले. त्यांनी क्षयरोगाचे परिणाम आणि प्रतिबंधात्मक उपायांविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला बी. फार्मसी अंतिम वर्ष आणि डी. फार्मसी प्रथम वर्षाचे एकूण १२० विद्यार्थी उपस्थित होते.हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक दिनेश रुपनर, व्यवस्थापक प्रतिनिधी  मा. प्राजक्ता रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय  अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. चेतन पतंगे यांनी केले, तर प्रा. श्रीनिवास माने यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) समन्वयक प्रा. निलेश धावरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button