महाराष्ट्र

सांगोला विद्यामंदिरची संस्कृती लोंढे वक्तृत्वमध्ये राज्यात प्रथम

सांगोला ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य माध्य‌मिक व उच्च माध्य‌मिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ, मुंबई यांच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय  वक्तृत्व स्पर्धेमध्ये सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशालेची विद्यार्थिनी कु.संस्कृती संतोष लोंढे (इयत्ता सातवी ) हिने प्रथम क्रमांक पटकाविला व शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे वतीने यावर्षीच्या इयत्ता पाचवी ते सातवी गटातील विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आभासी पद्धतीने घेण्यात आल्या.  स्पर्धेमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यातील विद्यार्थी सहभागी झाले होते.यामध्ये कु.संस्कृती हिने सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करत ‘निसर्गाप्रती माझे कर्तव्य’ या विषयावर  आपली अभ्यासपूर्ण मांडणी केली.
या यशाबद्दल संस्थाध्यक्ष  प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या हस्ते कु.संस्कृती व पालक म्हणून उपस्थित आई अर्चना लोंढे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य अमोल गायकवाड, पर्यवेक्षक सुरेश मस्तुद,प्रदीप धुकटे, मच्छिंद्र इंगोले व वांड़्मय मंडळातील शिक्षक उपस्थित होते.या स्पर्धेसाठी वाड़्मय मंडळ प्रमुख उन्मेष आटपाडीकर ,प्रशांत रायचुरे शैलजा झपके,उमेश नष्टे, अनिता घोंगडे,दत्तात्रय पाटील,संध्या तेली,श्रीकृष्ण वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत, संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके, उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button