सांगोला तालुका

सब जेल सांगोला येथे कायदेविषयक शिबिर संपन्न

सांगोला (प्रतिनिधी):- स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षांच्या निमित्ताने पॅन इंडिया जनजागृती उपक्रमाअंतर्गत तुरुंगातील बंदिस्त व्यक्तीनां मूलभूत कायदेशीर सहाय्य प्रदान करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशान्वये सन्माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. एस.ए.ए.आ. औटी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सब जेल सांगोला येथे दिनांक 07/11/2022 रोजी तालुका विधी सेवा समिती, सांगोला व सांगोला विधिज्ञ बार असोशिएशन यांचे मार्फत कायदेविषयक शिबीर आयोजित करणेत आले होते.
शिबिरामध्ये सहाय्यक अभियोक्ता श्री.सचिन महाडीक आणि अ‍ॅड. व्ही. एस. बेले यांनी कैद्यांचे अधिकार, अ‍ॅड. तानाजी टकले यांनी कैद्यांचे जामिनाबाबतचे अधिकार आणि अ‍ॅड. श्रीमती राजेश्वरी केदार यांनी कैद्यांचे समोपदेशन या विषयांबाबत कैद्यांना सखोल मार्गदर्शन उदाहरणांसह केले.
शिबिराचे शेवटी श्रीमती बी. एम. पोतदार, सह. दि.न्या.क.स्तर सांगोला यांनी वरील विषयांवर उदाहरणांसह कायदेविषयक ज्ञान तसेच विधी सेवा समितीची माहिती उपस्थित कैद्यांना करुन दिली.
सदर शिबिरामध्ये अ‍ॅड. आनंदा बनसोडे यांनी सूत्र संचालन केले. अ‍ॅड.धनंजय मेटकरी यांनी शिबिराची प्रस्तावना केली.  शिबिरामध्ये सांगोला न्यायालयातील सह दिवाणी न्यायाधीश मा.श्रीमती बी. एम. पोतदार मॅडम, सहाय्यक अभियोक्ता, सांगोला श्री.एस. आर. महाडीक साहेब, सांगोला विधिज्ञ बार असो.चे अध्यक्ष श्री. डी. जी. मेटकरी, सांगोला बार असो.चे सदस्य, न्यायालयीन कर्मचारी, पोलिस कर्मचारी उपस्थित होते. सदर शिबिरामध्ये अ‍ॅड. श्री. आनंदा बनसोडे यांनी आभारप्रदर्शन केले. सदर कार्यक्रमास तुरुंग कर्मचारी, जेलर यांनी कार्यक्रमाला होते.
या सर्व नियोजनाचे मार्गदर्शन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री.नरेंद्र जोशी साहेबांनी केल्याने त्यांचे आभार मानण्यात आले. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!