कंटेनरने धडक दिल्याने ग्रामसेविकेचा जागीच मृत्यू

सांगोला (प्रतिनिधी):-कंटेनरने धडक दिल्याने स्कुटीवरील ग्रामसेविकेचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना काल सोमवार दि.7 नोहेंबर रोजी सायंकाळी पावणेपाच वा. च्या सुमारास कडलास ता.सांगोला येथील अभिनव पेट्रोल पंपासमोर घडली आहे स्वप्नाली सुनील सोनलकर वय 35 रा.कडलास ता.सांगोला असे अपघातात मरण पावलेल्या ग्रामसेविकेचे नाव होय.
स्वप्नाली सोनलकर रा. कडलास ता.सांगोला या सोमवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता सांगोला येथून स्कुटी वरून कडलास ता. सांगोला मार्गे बुरंगेवाडी येथे कामावर जात असताना कंटेनरने मागून जोराची धडक दिल्याने स्वप्नाली सोनलकर या स्कुटी वरून रस्त्यावर पडल्या व कंटेनरचे मागील चाक डोक्यावरून गेल्याने स्वप्नाली सोनलकर या गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाल्याची घटना घडली आहे
याबाबत अजित अनुसे वय 30 रा. कडलास यांनी कंटेनर चालक पवार वय 24 रा. तांबोळे ता.मोहोळ याने त्याचे ताब्यातील कंन्टेनर भरधाव वेगात चालवून स्कुटी वरील स्वप्नाली सोनलकर यांना गंभीर जखमी करून त्यांच्या मृत्तूस कारणीभुत ठरल्या प्रकरणी कंन्टेनर चालक पवार रा . तांबोळे ता . मोहोळ याचे विरूध्द फिर्याद दिली आहे. तपास पो. कॉ अवताडे करीत आहेत.