सांगोला महाविद्यालयाच्या प्रा.विद्या जाधव यांना पीएचडी प्रदान

सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला येथील सांगोला महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या विभाग प्रमुख व रामकृष्ण टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका प्रा.सौ.विद्या संजय जाधव यांना राजस्थान येथील श्री.जगदीशप्रसाद झाबरमल टीबरेवाला विद्यापीठाची पीएचडी प्रदान करण्यात आली. प्रा. विद्या जाधव यांनी अँन एम्पिरिकल स्टडी ऑफ एम्प्लोयी एंगेजमेंट इफेक्ट ऑन कस्टमर लॉयलटी विथ रिस्पेक्ट टु सर्विस बेसड इंडस्ट्री इन सोलापूर डिस्ट्रिक्ट या विषयावर आपला शोध प्रबंध विद्यापीठास सादर केला होता. त्यांच्या या संशोधनाची दखल घेऊन विद्यापीठाने त्यांना दिनांक 07/11/2022 रोजी पीएचडी पदवी प्रदान केली.
त्यांनी हे संशोधन त्यांचे संशोधन मार्गदर्शक डॉ. महेशसिंग राजपूत व सह मार्गदर्शक डॉ. शरद टी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पूर्ण केले.त्यांच्या या यशाबद्दल सांगोला तालुका उच्च शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष श्री.प्रा. पी.सी.झपके , श्री तात्यासाहेब केदार, सचिव म.सी.झिरपे, प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले, माजी प्राचार्य डॉ.मधुसूदन बचुटे, वाणिज्य विभागाचे मा. विभागप्रमुख प्रा.बी.एस.खडतरे, डॉ.ए.आर.मासाळ, कार्यालयीन अधीक्षक श्री.प्रकाश शिंदे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. रामकृष्ण टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे ज्येष्ठ विश्वस्त इंजि.एम आर.गायकवाड, श्री.अंकुश गायकवाड, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. जयमालाताई गायकवाड, इंजि.विक्रांत गायकवाड व सर्व गायकवाड कुटुंबीय यांनी त्यांचे अभिनंदन केले.त्यांना हे संशोधन कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांचे पती श्री.संजय जाधव व संपूर्ण जाधव व गायकवाड कुटुंबातील सर्व सदस्यांनी प्रोत्साहन दिले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.