सांगोला: येथील फॅबटेक एज्युकेशन सोसायटी, संचलित फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस, फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड रिसर्च, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मधील माजी विद्यार्थिनी कु. सोनाली प्रकाश सुपले ( रा.शेवते ता.पंढरपूर जि.सोलापूर) हिने आपल्या शैक्षणिक आणि तांत्रिक कौशल्यांच्या जोरावर दुहेरी यश संपादन केले आहे. तिची महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (MSETCL) मध्ये सहाय्यक अभियंता आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) मध्ये सहाय्यक अभियंता या दोन्ही पदांवर निवड झाली आहे,अशी माहिती इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा.एच.एम.मल्लाड यांनी सागितले.
कु. सोनाली सुपले ने आपले शिक्षण फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस, फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड रिसर्च ,मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग चे शिक्षण पूर्ण केले. तिने विविध तांत्रिक स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि आपल्या कौशल्याने सर्वांना प्रभावित केले होते.
सोनालीने महापारेषण आणि महावितरण या दोन्ही सरकारी कंपन्यांच्या सहाय्यक अभियंता पदासाठीच्या परीक्षांमध्ये यश मिळवले. या परीक्षांमध्ये तांत्रिक ज्ञान, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणीवर आधारित प्रश्न विचारले जातात. सोनालीने या सर्व विषयांमध्ये चांगली तयारी केली होती, ज्यामुळे तिला दोन्ही परीक्षांमध्ये यश मिळाले.
सोनाली सुपलेचे हे यश फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरींगसाठी आणि तिच्या कुटुंबासाठी गौरवास्पद आहे. तिने हे सिद्ध केले आहे की कठोर परिश्रम आणि समर्पण यांच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते. सोनालीच्या या यशाने फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग च्या इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.
फॅबटेक एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष मा.श्री.भाऊसाहेब रुपनर, सचिव डॉ.अमित रुपनर, कार्यकारी संचालक मा.श्री.दिनेश रूपनर, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ .संजय अदाटे, प्राचार्य डॉ. रवींद्र शेंडगे, उप प्राचार्य प्रा.डॉ विद्याराणी क्षीरसागर, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा.एच.एम.मल्लाड, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे, प्रा.पल्लवी बिले, प्रा.रुपाली बनसोडे ,लॅब असिस्टंट श्री. प्रशांत गोडसे तसेच शिक्षकवृंद ,विद्यार्थी,व पालकांनीही सोनाली सुपलेच्या या यशाबद्दल तिचे अभिनंदन केले आहे. सोनाली सुपलेच्या यशाने महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे.