सांगोला विद्यामंदिरमध्ये रमजान ईद निमित्त ‘शीरखुर्मा’ पार्टी

सांगोला ( प्रतिनिधी ) सध्याच्या काळात समाजात ऐक्य,सहिष्णुता आणि बंधुत्व वृद्धिंगत होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा विचार प्रमाण मानत सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मधील मुस्लिम शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आपले सहकारी शिक्षक बंधू भगिनीसाठी प्रेम,आपुलकीची भावना ठेवत रमजान ईद सणानिमित्त ‘शिरखुर्मा’ पार्टीचे आयोजन केले.
शिरखुर्मा पार्टीसाठी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, कार्यकारिणी सदस्या शीलाकाकी झपके, प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद,उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक सुरेश मस्तुद, प्रदीप धुकटे, मच्छिंद्र इंगोले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहत पार्टीचा आस्वाद घेतला. .
हा उपक्रम एकमेकांच्या आनंदात सहभागी होण्याचा आणि सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करण्याचा संदेश देणारा आहे. म्हणून सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला व सांगोला विद्यामंदिरच्या वतीने संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, संस्था कार्यकारणी सदस्य शीलाकाकी झपके, प्राचार्य अमोल गायकवाड यांचे हस्ते व प्रशासकीय अधिकारी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद, प्रा.इसाक मुल्ला, सहशिक्षक अशपाक काझी,अन्सार इनामदार,मुस्तफा नदाफ
सहशिक्षिका मेहजबिन मुलाणी,परी मुलाणी
शिक्षकेतर कर्मचारी मोहसीन मुजावर या मुस्लिम शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.