पायोनियर पब्लिक स्कूल (सीबीएसई) य.मंगेवाडी मध्ये नवागतांचे उत्साहात स्वागत

खंडोबा बहुउद्देशीय संस्था संचलित पायोनियर पब्लिक स्कूल (सीबीएसई) य.मंगेवाडी येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. शाळेने नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी विशेष स्वागत समारंभ आयोजित केला होता. नव्या विद्यार्थ्यांचे शाळेतील औक्षण करून फुलांच्या वर्षावासह विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शाळेचा परिसर फुगे व चित्रांनी सजविला होता. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व खाऊ वाटप केल्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे संस्थापक आणि श्री अनिल येलपले सर उपस्थित होते.शालेय शिस्त व नियम याबाबत स्कूलचे प्रिन्सिपल सतीश देवमारे सर यांनी माहिती सांगितली. व स्कूलचे संस्थापक मा श्री.अनिल येलपले सर यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यानंतर प्रिन्सिपल सतीश देवमारे सर यांनी नवीन शिक्षकांची ओळख करून दिली आणि त्यांचे मन:पूर्वक स्वागत केले.
संपूर्ण शाळा नवीन वर्षाच्या सुरुवातीस आनंदी वातावरणात रंगून गेली होती.ज्ञान,संस्कार आणि विकास ही त्रिसूत्री घेऊन विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्यासाठी पायोनियर स्कूल अहोरात्र झटत आहे.गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ही शाळा प्रसिध्द आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ हे १ एप्रिल पासून सुरू झाले असून स्पर्धात्मक युगात पुढे जाण्यासाठी पायोनियर पब्लिक स्कूल (सीबीएसई) मध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन आपले भविष्य उज्वल करावे असे आवाहन संस्थाध्यक्ष श्री.अनिल येलपले सर आणि प्रिन्सिपल श्री.सतीश देवमारे सर यांनी केले आहे.