ज्ञान, विज्ञान आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजे उत्कर्ष विद्यालय- प्रा. विजय पवार सर

माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संचलित उत्कर्ष विद्यालय सांगोला येथे शैक्षणिक वर्ष 2024- 25 चा ‘वार्षिक क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ’ संपन्न झाला.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय तसेच जिल्हास्तरी शालेय क्रीडा स्पर्धा सन 2024- 25 मध्ये घेण्यात आलेल्या बुद्धिबळ, बॉक्सिंग, कराटे, जिम्नॅस्टिक तसेच क्रिकेट या स्पर्धांमध्ये तसेच शालेय मैदानी स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.
सदर कार्यक्रम प्रसंगी बोलताना ज्ञान, विज्ञान आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजे उत्कर्ष विद्यालय.. असे गौरवोद्गार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे क्रीडा शिक्षक प्रा. विजय पवार सर यांनी आपल्या मनोगता दरम्यान काढले.
विद्यालयाच्या क्रीडा स्पर्धेतील उज्वल यशाचा गौरव करताना मा. चडचणकर सर म्हणाले, मनगटात रग आणि छातीत धग असेल तरच इतिहास घडतो..
आपल्या अध्यक्षीय मनोगतात संस्था अध्यक्षा मा. नीलमताई कुलकर्णी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना विद्यार्थ्यांना हिऱ्याचे उपमा देत विद्यालयाच्या गौरव कायम राखण्याच्या आवाहन केले.
या सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक तसेच मार्गदर्शक क्रीडा शिक्षक सचिन गोतसूर्य सर यांचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे क्रीडा शिक्षक प्रा. विजय पवार, क्रीडा शिक्षक विजयकुमार चडचणकर सर, संस्थाध्यक्षा मा. नीलिमाताई कुलकर्णी, मा. डॉ. संजीवनीताई कुलकर्णी, संस्था सचिव वसुंधराताई कुलकर्णी, संस्था कोषाध्यक्षा डॉ. शालिनीताई कुलकर्णी माध्यमिकचे मुख्याध्यापक सुनील कुलकर्णी सर, प्राथमिक मुख्याध्यापिका मागाडे बाई, पर्यवेक्षक भोसले सर व मिसाळ सर यांनी खूप कौतुक केले.