सांगोला तालुक्यात वेगवेगळ्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू
सांगोला तालुक्यात वेगवेगळ्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू
सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला तालुक्यात कोळा व कमलापुर येथे वेगवेगळ्या झालेल्या दोन युवकांचा अपघातात दोघांचा मृत्यू झाला असल्याची घटना 2 एप्रिल रोजी घडली.अपघातात अमित घुले (वय 30 वर्षे, रा. पाचेगाव खुर्द ता. सांगोला) व व सुरज निषाद (वय 23 वर्षे, रा. मगरघटा ता. बेमेतरा जि. नांदघाट रा. थत्तीसगड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. अपघाताची फिर्याद वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय सांगोला यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे.
सांगोला पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पहिल्या अपघातात अमित सदाशिव घुले हा अनुसे मळा सांगोला ते मिरज जाणारे रोडवर कमलापुर ता. सांगोला येथे रस्ते अपघातामध्ये गंभीर जखमी झालेने त्यास उपचारास ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे दाखल केले असता तो उपचारापुर्वीच मयत झाला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.पुढील तपास पोहेकाँ भोसले हे करीत आहेत.
त्याचप्रमाणे दुसर्या अपघातात सुरज संतोष निषाद हा आटपाडी रोड कोळा ता. सांगोला येथे रस्ते अपघातामध्ये जखमी झालेने त्यास उपाचाराकरीता ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे दाखल केले असता तो उपचारापुर्वीच मयत झाला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.पुढील तपास पोहेकाँ भोसले हे करीत आहेत.