सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची जल्लोषात सुरूवात

सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल(सी.बी.एस.ई ) मध्ये नवीन शैक्षणिक वर्षास बुधवार दि. 2/4/2025 रोजी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिल्पा ढाळे व सर्व शिक्षक,पालक उपस्थित होते.
सुरूवातीला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिल्पा ढाळे व सर्व शिक्षकांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिल्पा ढाळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व वर्षभरामध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयी थोडक्यात माहिती दिली. तसेच सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष-2025-26 साठी सध्या प्रवेश प्रक्रीया सुरू असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश नोंदविण्याविषयी आवाहन केले.