सांगोला : फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅड रिसर्च महाविद्यालयाच्या सिव्हील इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर आणखी एक उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची प्रतिष्ठित सातव स्टोन कंपनी प्रा. लि. मध्ये निवड झाली आहे, अशी माहिती सिव्हील इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख प्रा.शिवानंद माळी यांनी दिली.
सातव स्टोन कंपनी ही बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी आहे. कंपनीने फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कॅम्पस मुलाखती आयोजित केल्या होत्या. या मुलाखतींमध्ये विद्यार्थ्यांनी त्यांची तांत्रिक कौशल्ये आणि ज्ञान दाखवले. या मुलाखतीच्या आधारे, कंपनीने कु.विजया माने (कमलापूर),समरजीत गडदे(उच्चेठाण), कु.पूजा राऊत(मेडशिंगी),साहिल मणेरी (सांगोला),कु.वैष्णवी लेंडवे (लेंडवे चिंचाळे),कु. रुपाली जाधव(सांगोला),कु.ऐश्वर्या इंगवले (सांगोला), कु.कोमल कोळी ( हुलजंती ) या विद्यार्थ्यांची निवड केली आहे.
या यशाबद्दल फॅबटेक एज्युकेशन सोसायटी संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.भाऊसाहेब रुपनर, सचिव डॉ.अमित रुपनर,कार्यकारी संचालक मा.श्री.दिनेश रूपनर, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ .संजय अदाटे, प्राचार्य डॉ. रवींद्र शेंडगे, उप प्राचार्य प्रा.डॉ विद्याराणी क्षीरसागर, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सिव्हिल इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख प्रा.शिवानंद माळी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, “हे यश तुमच्या कठोर परिश्रमाचे आणि प्रामाणिक प्रयत्नांचे फळ आहे. सातव स्टोन कंपनीत काम करताना तुम्ही तुमच्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा योग्य वापर कराल, अशी मला खात्री आहे.
सातव स्टोन कंपनीचे मानव संसाधन व्यवस्थापक श्री. मच्छिंद्र पी. सातव पाटील यांनी सांगितले की, फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहेत आणि त्यांच्यामध्ये कामाची आवड आहे. आम्हाला या विद्यार्थ्यांसोबत काम करायला आवडेल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आणि महाविद्यालयातील शिक्षकांचे आभार मानले. विद्यार्थ्यांनी सांगितले की, “महाविद्यालयातील शिक्षकांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केले आणि आम्हाला या यशापर्यंत पोहोचण्यास मदत केली.”