महाराष्ट्र
डॉ.गणपतराव देशमुख सह.सूत गिरणी,रोटरी क्लब ऑफ़ सांगोला,आपुलकी प्रतिष्ठान, सांगोला अर्बन बँक, महात्मा फुले पतसंस्थेच्या वतीने वारकर्याना फराळ वाटप..

सांगोला: रविवार दिनांक 6 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे…त्या निमीत्ताने शेकडो वारकरी व दिंड्या पंढरपुर कडे मार्गस्थ आहेत..सांगोला सूतगिरणी व अन्य सेवाभावी संस्था दरवर्षी वारकरी भक्तांच्या सेवेसाठी फराळाचे वाटप करतात..त्याचाच एक भाग म्हणून या वर्षी सूत गिरणीचे चेअरमन डॉ.प्रभाकर माळी,रोटरी क्लब ऑफ सांगोलाचे नूतन अध्यक्ष रो.श्रीपती आदलिंगे,नूतन सचिव रो.विजय म्हेत्रे (माजी अध्यक्ष ) आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पत्रकार राजेंद्र यादव यांच्या प्रेरणेतुन कोल्हापुर- पंढरपुर मार्गावरुन पायी चालणार्या वारकरी बांधवांसाठी साबूचिवडा पाकिट केळी,पाणी बोट्ल व चहा- बीस्कीट वाटपाचे आयोजन करण्यात आले होते..
त्या नुसार सकाळी सहा वाजलेपासून फराळ वाटपास सुरुवात करण्यात आली..या प्रसंगी रो.सुरेश माळी,रो.इंजि.मधुकर कांबळे, इंजि अशोक गोडसे, डॉ. महादेव कोळेकर, मिलींद बनकर , इंजि विलास बिले,धनाजी शिर्के,प्रा.राजेंद्र ठोंबरे, प्रा. साजिकराव पाटील, अरविंद डोंबे गुरुजी, डॉ अनिल कांबळे आदि उपस्थित होते..



