सिंहगड संकुलात माननीय कुलगुरूंच्या हस्ते राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन
सिंहगड कॅम्पस कमलापूर येथील श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ एज्युकेशन कमलापूर येथे दिनांक 05 एप्रिल 2024 रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी या विषयावरती एकदिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर परिसंवादाचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे मा.कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर व संस्थेचे सहसचिव मा.संजय नवले सर यांच्या हस्ते होणार आहे.
सदर परिसंवादामध्ये प्रमुख उपस्थिती कुलपती नियुक्त मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य मा. देवानंद चिलवंत तसेच संस्थेच्या शिक्षण अधिष्ठाता सौ.आशा बोकील मॅडम व सिंहगड कॅम्पस चे कॅम्पस डायरेक्टर मा. अशोक नवले सर उपस्थित राहणार आहेत सदर परिसंवादामध्ये देशातील व महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक सहभागी होणार आहेत या परिसंवादामध्ये देशामध्ये जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणलेले आहे त्या धोरणामध्ये जे बदल झालेले आहेत त्या बदला विषयी माहिती देण्यासाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील शिक्षणशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. कृष्णा पाटील व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत नाशिक येथील बीएड कॉलेजचे प्रोफेसर मा. डॉ. किशोर चव्हाण हे मार्गदर्शन करणार आहेत
सदर परीसंवादाचा आपल्या भागातील विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी यांनी सहभाग घेऊन नवीन शैक्षणिक धोरणातील बदल कसे आहेत व त्याचे अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार आहे याविषयी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील सर यांनी केले आहे