सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख यांचा वाकी घेरडी गावात संवाद दौरा व कॉर्नर सभा संपन्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या संस्कृती व परंपरेचे दर्शन घडविले- श्रीकांत दादा

सांगोला:-  सोलापूर जिल्हा परिषदेचे बिनविरोध सदस्य श्रीकांत दादा देशमुख यांचा तालुक्यातील वाकी घेरडी संवाद दौरा व कॉर्नर सभेत संपन्न झाली. कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांचे वाद्याच्या फटाक्यांच्या आतिषबाजीने ग्रामस्थांनी स्वागत केले.
या दौऱ्यात त्यांच्या बरोबर सांगोल्याचे माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार, भटक्या विमुक्त जाती मोर्चाचे भाजपाचे राज्य उपाध्यक्ष विजय इंगवले, भाजपा ओबीसी मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय कोळेकर, किसान मोर्चाच्या जिल्ह्याचे पदाधिकारी नंदकुमार बाबर, सुधाकर बाबर, वस्ताद मुबारक मुलानी , भाऊ गावडे, भारत कोकरे, युवा मोर्चाचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत कावळे, तायाप्पा घुणे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
श्रीकांत दादा व मान्यवरांचा सत्कार मा. सरपंच बंडोपंत कांबळे मा.ग्रा.पं.सदस्य हणमंत लवटे, युवा नेते सतीश कांबळे , अजित खांडेकर, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन रामचंद्र लवटे, विजय देवकते, नंदकुमार लवटे यांनी फेटे बांधून केले.प्रास्ताविक सतीश कांबळे यांनी केले.गावच्या वैयक्तिक आणि अडचणी समजून घेऊन मार्गी लावण्याचे आश्वासन श्रीकांत दादांनी दिले.
यावेळी श्रीकांत दादा म्हणाले की, आपल्या लोकांच्या अडचणी, समस्या लोकसभा मतदान अगोदर सोडवाव्या यासाठी हा संवाद दौरा आयोजित करून कॉर्नर सभा आयोजित केली आहे. लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आपल्या भाजपा महायुतीचा उमेदवार म्हणून रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजप पक्षात उमेदवारी बदलण्याची प्रथा नाही त्यामुळे आपण पक्षाने दिलेल्या उमेदवाराचे कामास लागावे.
केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारने आपल्या तालुक्यातल्या शेतीच्या पाण्याच्या टेंभू योजना, म्हैसाळ योजना, नीरा उजवा कालवा योजनांसाठी हजारो कोटी निधी पंतप्रधान जलसंपदा मधून व बळीराजा योजनेतून दिल्यामुळे त्या पूर्णत्वास गेल्या आहेत. गेल्या दहा वर्षापासून नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी या कालावधीत देशातला आतंकवाद, दहशतवाद, नक्षलवाद, काळाधन, भ्रष्टाचार समूह हद्दपार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था ११ व्या स्थानावरून  पाचव्या स्थानावर आलेली आहे. देशाची अर्थव्यवस्था  शेतकऱ्यांच्या श्रमावर व कामगारांच्या कामावरून आधारलेली असून तिला मोदींच्या रूपाने तिसऱ्यांदा पंतप्रधान करून पहिल्या तीन स्थानांमध्ये आणण्यासाठी आपल्या कमळाचे चिन्हावरचा खासदार निवडून देणे गरजेचे आहे . नरेंद्र मोदींनी देशातली तरुणांची बेरोजगारी हटवण्यासाठी पंतप्रधान कौशल्य विकास योजनेतून ज्याला ज्या धंद्यात रस आहे त्या धंद्याचे मोफत प्रशिक्षण देण्याची योजना सुरू केली. त्या उद्योजकाला अर्थसहाय्यासाठी पंतप्रधान मुद्रा योजनेतून विना तारण बँकांकडून कर्ज पुरवण्याचा मोठा प्रयत्न केला व बेरोजगारी युवकांना नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे बनो असा नारा दिला.विरोधकांना बेछुट आरोप करण्याशिवाय काहीच राहिले नाही म्हणून उद्याच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा असे कळकळचे आव्हान त्यांनी केले.
कॉर्नर सभा सीसी करण्यासाठी दत्ता दाईगंडे, विश्वास शिंदे, शुभम दाईगंडे,  दिगंबर निमग्रे, कुंडलिक घुणे, भिवाजी वाघमारे, श्रीमंत लवटे, दत्तात्रय मेटकरी, पांडुरंग लवटे, प्रमोद शिंदे, जयराम वाघमारे, पांडुरंग दाईगंडे, जीवन जगधने, बापू वाघमारे, दिलावर पटेल, आप्पा दाईगंडे, सचिन कांबळे, आचंद्र वाघमारे, रामचंद्र निमग्रे, लहू निमग्रे यांनी परिश्रम घेतले.आभार मा. ग्रा.पं.सदस्य हणमंत लवटे यांनी मांडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!