जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मिळालेल्या पदाचा उपयोग करावा- डॉ.बाबासाहेब देशमुख

भाई दिपक गोडसे यांची निवड झाल्याबद्दल व शांताराम देवकते यांचा सत्कार संपन्न

महूद(प्रतिनिधी):-आबासाहेबांवरती व देशमुख कुटुंबीयावरती नितांत निष्ठा असणार्‍या पैकी गोडसे कुटुंब आहे.संजयमामा गोडसे व दिपक गोडसे हे आबासाहेबाप्रमाणे माझ्यावरती प्रेम करीत आहेत.दिपक गोडसे व शांताराम देवकते यांची झालेली निवड ही आनंदाची गोष्ट आहे. मिळालेल्या पदाचा उपयोग त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी करावा असे आवाहन पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख यांनी केले.
खिलारवाडी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल तसेच विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी भाई दिपक गोडसे यांची निवड झाल्याबद्दल व शांताराम देवकाते यांची व्हा.चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खिलारवाडी शेतकरी कामगार पक्षाच्या व पुरोगामी युवक संघटनेच्या वतीने डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते भव्य नागरी सत्कार समारंभात संपन्न झाला.
सत्कारास उत्तर देताना भाई दिपक गोडसे म्हणाले की.आम्ही जाती पातीच्या राजकारणावर विश्वास ठेवत नाही.. शेतकरी कामगार पक्षाने पक्षनिष्ठेच्या जोरावरती खुप काही दिले आहे.अनेक ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली आहे.येणार्‍या 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या पाठीशी युवकांची फळी उभी करण्यासाठी आणखीन जास्त प्रमाणात प्रयत्न करणार असलेचे सांगितले.यावेळी अ‍ॅड. भाई मारुती ढाळे यांनी सविस्तर पणे सध्याच्या राजकीय परिस्थितीवर प्रकाश टाकला.
प्रारंभी डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांची रथामध्ये बसुवुन हालगीच्या ,डि.जे च्या तालावरती व फटाक्यांची आतषबाजीत गुलालाची मुक्त उधळन करीत भव्य मिरवणुक काढण्यात आली..सदर कार्यक्रमास घेरडी,कोळा, सांगोला, कडलास, ऊदनवाडी,जवळा,ईटकी,खवासपुर,वाकी,लोटेवाडी , डोंगरगाव, लक्ष्मीनगर, नरळेवाडी, महिम, लोणारवाडी, तिसंगी, सोनके,बंडगरवाडी,व महुद गावचे सर्व पदाधीकारी,नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाई बाळासाहेब पाटील, भाई संजय गोडसे, नवनाथ पाटील, विनायक बागल,शरद हिप्परकर, धर्मराज केदार, रोहीदास चौगुले, नवनाथ देवकते, भालचंद्र गोडसे, भारत चौगुले, निलेश खांडेकर,किरण नरळे,बाबा काळेल, वैभव खांडेकर, विजय नरळे,  बाळासाहेब कांबळे,  दत्तात्रय टकले,  आप्पा देवकाते, जिवराम टकले, गोवींद हिप्परकर, अक्षय कांबळे, अमोल कांबळे, इत्यादींनी  परिश्रम घेतल्याची माहिती प्रसिद्ध प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button