दिशा हॉस्पिटल सांगोला येथे मुख्यमंत्री साह्यता निधी योजना सुरू

सांगोला ( प्रतिनिधी )- दिशा हॉस्पिटल सांगोला येथे मुख्यमंत्री साह्यता निधी योजना सुरू झालेली आहे, तरी गरजू रुग्णांनी गुडघ्याच्या तसेच मांडीच्या खुब्याच्या सांधा बदलीचे ऑपरेशन म्हणजे TKR आणि THR साठी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. सचिन गवळी यांनी केले आहे.
सांगोला शहरातील कडलास नाका येथे असलेल्या दिशा हॉस्पिटलला नुकतेच NABH नामांकन मिळाले असून या हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री साहाय्यता निधी योजना अंतर्गत सांधा रोपण शस्त्रक्रिया, मणक्याचे ऑपरेशन साठी मदत उपलब्ध होणार आहे.
मुख्यमंत्री सहायत्ता निधी ह्या योजनेअंतर्गत दिशा हास्पिटल सांगोला नुकतेच गणेश वाडी येथील सिताराम सोळगे या रुग्णाच्या मांडीच्या खुब्याचे कृत्रिम सांधरोपण शस्त्रक्रिया नुकतीच करण्यात आली त्यांना इम्पोर्टेड सांधा बसवण्यात आला(TOTAL HIP REPLACEMENT ) ह्या योजने मुळे रुग्णास शासनाकडून १ लाख रुपये मदत निधी मिळाला आहे.
        मेडिक्लेम कॅशलेस सुविधाही उपलब्ध झाली असून स्टार हेल्थ  इन्शुरन्स कंपनी, रिलायन्स जनरल  इन्शुरन्स कंपनी ..Sbi जनरल इन्शुरन्स कंपनी, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी,ICICI लोम्बर्ड इन्शुरन्स कंपनी, MD इंडिया, MEDI ASSIST TPA.VOLO health TPA Universal Sompo Insurance ह्या कंपनी साठी cashless सुविधा उपलब्ध असल्याचे डॉ. सचिन गवळी यांनी सांगितले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button