सांगोला महाविद्यालयात सत्तावन विद्यार्थ्यांचे रक्तदान

सांगोला प्रतिनिधी : येथील सांगोला महाविद्यालया मध्ये लायन्स क्लब सांगोला, रेवनील रक्त पेढी सांगोला आणि या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास विद्यार्थ्यांनी भर भरून प्रतिसाद दिला. सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या शुभ हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले . या शिबिरात सत्तावन विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.
या वेळी प्रा.झपके, म्हणाले महाविद्यालयीन जीवनापासून मला रक्तदानाची आवड होती. मी विद्यार्थी दशेपासूनच विविध रक्त पेढींचा सदस्य असून नियमित रक्तदान करून समाज सेवेच कामं करत आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून त्यामुळे आपण दुसऱ्या कोणाला तरी जीवनदान देत असतो. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या रक्तदात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी संस्थेचे सचिव अँड. उदय(बापू) घोंगडे, प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले, रेवनील रक्तपेढी चे प्रमुख सोमेश्वर यावलकर, लायन्स क्लब चे अध्यक्ष उन्मेष आटपाडीकर, मुख्याध्यापक अमोल गायकवाड उपस्थित होते. या रक्तदान शिबिराचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजने चे कार्यक्रम अधिकारी डॉ. नवनाथ शिंदे , डॉ. सदाशिव देवकर व राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख कॅ. प्रा. संतोष कांबळे यांनी केले. या शिबिरासाठी प्रा. संतोष लोंढे, प्रा. गणेश पैलवान, सिद्धेश्वर स्वामी, भाऊ गायकवाड व सुनील शिंदे यांचे सहकार्य लाभले. या वेळी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.