फॅबटेक इंजिनिअरिंगमध्ये ‘टेक्नो – फॅब २ के २५’ राष्ट्रीय तांत्रिक परिसंवाद स्पर्धा संपन्न

सांगोला : फॅबटेक एज्युकेशन सोसायटी संचलित, फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस, फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड रिसर्च, सांगोला येथे आयोजित करण्यात आलेली ‘टेक्नो – फॅब २ के २५’ ही राष्ट्रीय तांत्रिक परिसंवाद स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेतील उद्दिष्ट विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानाला चालना देणे आणि त्यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनांना प्रोत्साहन देणे हे होते.
या परिसंवादात महाराष्ट्रासह इतर राज्यांतील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांतील एकूण ९०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेत कॉम्पुटर सायन्स इंजिनिअरिंग, ए.आय.डी.एस, सिव्हील इंजिनिअरिंग, ई.एन.टी.सी.इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आदी शाखांतील वेबसाइट डिझाइन,प्रकल्प स्पर्धा, नैसर्गिक एसी असलेली निवासी इमारत ,पुल डिझाइन , चॅटबॉट विकास फ्री फायर , कोड मॅनिया,बीजीएमआय गेमिंग , आधुनिक शेतीसाठी स्मार्ट सोल्युशन ,कॅडवॉर , टेक्नीकल पोस्टर सादरीकरण, सर्किट फेस्ट बिगिनर , सर्किट फेस्ट एक्सपर्ट ,टेक्नो कोडिंग , सर्किट बनवणे आणि डीबगिंग या विषयांवर सादरीकरण करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले श्री. बाळकृष्ण शिंपुकडे चेअरमन, शिंपुकडे ग्रुप ऑफ कंपनीज कोल्हापूर यांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानातील नवोपक्रम व संशोधनाच्या गरजेवर मार्गदर्शन केले. त्यांनी नव्या पिढीने केवळ नोकरीसाठी नव्हे तर समाजाभिमुख नवकल्पनांसाठी संशोधन करावे,आणि कौशल्य संपादन करण्यासाठी विविध तांत्रिक उपक्रमामध्ये सहभागी झाले पाहिजे असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
‘टेक्नो – फॅब २ के २५’ या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक जाणिवा वाढीस लागल्या असून, अशा स्पर्धा भविष्यातील संशोधक घडवण्यासाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वास फॅबटेक एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ.अमित रुपनर यांनी व्यक्त केला.
यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व विजेत्यांना पारितोषिके फॅबटेक एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा.श्री.भाऊसाहेब रुपनर, सचिव डॉ.अमित रुपनर, कार्यकारी संचालक मा.श्री.दिनेश रूपनर , व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ .संजय अदाटे, प्राचार्य डॉ. रवींद्र शेंडगे, उप प्राचार्या प्रा.डॉ विद्याराणी क्षीरसागर, डीन ॲकॅडमिक डॉ.शरद पवार, डीन स्टुडंट डॉ.संजय पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी टेक्नो – फॅब २ के २५’ चे समन्वयक प्रा. आशिष जोशी व संपूर्ण प्राध्यापकवर्ग यांनी मेहनत घेतली.