सांगोला:इंजिनियरिंग क्षेत्रामध्ये पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यवहारी ज्ञानास म्हणजेच प्रत्यक्षिकास जास्त महत्व आहे.त्यामुळे फॅबटेक पॉलिटेक्निकचा क्षेत्र भेटी आयोजित करण्यावर विशेष प्रयत्न असतो.त्याचाच एक भाग म्हणून पॉलिटेक्निकच्या सिव्हिल विभागाने विद्यार्थ्याना पंढरपूर येथील जलशुद्धिकरण केंद्रास भेट दिली.या क्षेत्रभेटीमधून विद्यार्थ्याना एरिएशन, सेडिमेंटेशन, फ्लॉक्यूलेशन , क्लोरिनेशन इत्याती प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळाली व प्रात्यक्षिक पाहण्यास मिळाल्याचे सिव्हिल विभागाचे विभागप्रमुख प्रा.शाम कोळेकर यांनी सांगितले.
या भेटीसाठी सिव्हिल विभागातून ३७ विद्यार्थ्यानी आपला सहभाग नोंदवला. ही भेट यशस्वी होण्यासाठी समन्वयक प्रा.शरद पवार यांनी परिश्रम घेतले.हा उपक्रम संस्थेचे चेअरमन मा.श्री.भाऊसाहेब रूपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे , पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.तानाजी बुरुंगले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.