सांगोला ( उत्तम चौगुले ):-श्री सत्यसाई सेवा संघटना महाराष्ट्र राज्य शाखा पंढरपूर यांचे वतीने मेडशिंगी येथील एसटी स्टँडच्या समोर आज रोजी सकाळी दहा वाजता पानपोई चे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी श्री सत्यसाई सेवा संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी श्री चंद्रशेखर मुंबई (वॉटर प्रोजेक्ट इन्चार्ज) श्री संपतराव वाघाटे पंढरपूर डॉक्टर प्रकाश जडल सोलापूर सदर संघटनेचे सेवाभावी कार्यकर्ते श्रीनिवास यमुल, श्री दत्तात्रय सिद्धम, श्री बालाजी परमेल, सोलापूर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते श्री सत्य साई सेवा संघटना महाराष्ट्र राज्य यांचे वतीने पाणपोईचे उद्घाटन श्री चंद्रशेखर साहेब मुंबई व मेडशिंगी चे सरपंच श्री प्रताप सिंह इंगवले यांचे हस्ते फीत कापून करण्यात आले
या कार्यक्रमासाठी मेडशिंगी गावचे माजी सरपंच श्री जालिंदर माने , संतोष पाटील, मिलिंद वेदपाठक, विनायक नस्टे ,प्रशांत झाडबुके, सुनील इंगवले , प्रशांत पाटील, समाधान कसबे, गणेश पाटील, तानाजी अळतेकर, सुनील इंगवले आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री बसवेश्वरअण्णा झाडबुके यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. असल्या कडक उन्हाळ्यामध्ये पान पोई जोपर्यंत पाऊस येत नाही तोपर्यंत चालू राहणार असल्याचे उद्घाटन प्रसंगी बोलताना संघटनेचे मुंबईचे पदाधिकारी श्री चंद्रशेखर (इन्चार्ज वाटर प्रोजेक्ट) यांनी आपले विचार मांडताना सांगितले.