महाराष्ट्र

जवळे हायस्कूल मध्ये इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेला उत्साहात सुरुवात.

जवळे(प्रशांत चव्हाण) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचेकडून घेण्यात येणारी माध्यमिक प्रमाणपत्र (एस एस सी)परीक्षा शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारी 2025 पासून कै.सौ.वत्सलादेवी देसाई विद्यालय व कै.अण्णासाहेब घुले-सरकार कनिष्ठ महाविद्यालय जवळे या प्रशालेत उत्साहात सुरू झाली.जवळे परीक्षा केंद्र क्रमांक 3162 अंतर्गत जवळे हायस्कूल जवळे,नराळे विद्यालय नराळे, गुरुदत्त विद्यालय वाकी(घेरडी)प्रगती विद्यालय वाणीचिंचाळे भोपसेवाडी विद्यालय भोपसेवाडी या 5 विद्यालयातील एकूण 360 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेसाठी केंद्र संचालक म्हणून प्राचार्य श्री.बाळासाहेब शिंदे सर यांची तसेच उपकेंद्र संचालक म्हणून श्री.बी.डी.शिंदे सर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना संस्थाध्यक्ष माजी आमदार श्री.दीपक आबा साळुंखे-पाटील,संस्था उपाध्यक्ष श्री. मनाजीराव घुले-सरकार, संस्था सचिव श्री.सुभाष लऊळकर सर प्राचार्य श्री.बाळासाहेब शिंदे सर ,उपमुख्याध्यापक श्री.संजय पौळ,सर सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी पालक यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button