रोटरी क्लब सांगोला यांच्या वतीने सांगोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ येथील शालेय विद्यार्थ्यानी करीता मोफत नृत्य कार्यशाळेचा उद्घाटन कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यशाळेंतर्गत शाळेतील निवडक विद्यार्थिनींना मोफत नृत्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ४ दिवसाचा असेल.सौ.कल्याणी सपाटे या उत्कृष्ट नृत्य प्रशिक्षक असून त्यांना विविध पारितोषिके मिळाली आहेत त्यांच्यामार्फत मुलींना शास्त्रशुद्ध व आधुनिक अशा दोन्ही पद्धतीने नृत्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्या प्रसंगी शिकणाऱ्या मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णीनीय होता.
याप्रसंगी रोटरी क्लब सांगोल्याचे अध्यक्ष रो.इंजि.विकास देशपांडे यांनी या कार्यक्रमाचा मुलीना त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी नक्कीच उपयोग होईल असे सांगितले.याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका सौ.शहनाझ सलीम अत्तार यांनी शाळेत कार्यक्रम घेतल्याबद्दल रोटरी क्लब चे आभार मानले.
या कार्यक्रमास रोटरी सचिव रो.इंजि. विलास बिले आदी उपस्थित होते.