महाराष्ट्र

संशोधन क्षेत्रात आणखी एक अभिमानास्पद यश ;फॅबटेकचे प्रा. राहुल औताडे यांना भारत सरकारकडून पेटंट मंजूर

सांगोला (प्रतिनिधी) – फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला, येथील मेकॅनिकल अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख प्रा. राहुल शिवाजी औताडे यांच्या नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्पास भारत सरकारकडून पेटंट मंजूर झाले आहे.

त्यांनी विकसित केलेल्या “A Cantilever Type Piezoelectric Vibration Energy Harvester Having Frequency Tuning Provision” या यंत्रणेमुळे कंपन्यांपासून ऊर्जा निर्माण करण्याच्या प्रक्रियेत मोठी क्रांती घडवता येणार आहे. हा शोध ऊर्जा संकलन (Energy Harvesting) क्षेत्रात एक महत्वपूर्ण टप्पा आहे, जो विशेषतः कंपनांमधून निर्माण होणारी ऊर्जा वीजेमध्ये रूपांतरित करण्यास मदत करतो. यामध्ये फ्रिक्वेन्सी ट्यूनिंगची सुविधा असून, विविध कंपन्यांच्या वारंवारता नुसार सिस्टमला जुळवून घेता येते, जे कार्यक्षमतेत वाढ करते. हे पेटंट 20 वर्षे पर्यंत वैध असून, पेटंट्स कायदा 1970 नुसार मान्य करण्यात आले आहे. संशोधनाच्या या यशामुळे महाविद्यालयाची कीर्ती संशोधन व नवोपक्रमाच्या क्षेत्रात अधिक बळकट झाली आहे. विद्यार्थ्यांसाठी हे एक प्रेरणादायी पाऊल ठरणार आहे. ही तंत्रज्ञान प्रणाली कंपनांच्या माध्यमातून निर्माण होणारी ऊर्जा संकलित करून ती विद्युत ऊर्जेत रूपांतरित करते. विशेषतः, यामध्ये ‘फ्रिक्वेन्सी ट्यूनिंग’ची सुविधा दिल्यामुळे विविध वातावरणीय अटींमध्ये देखील उच्च कार्यक्षमता राखता येते.
प्रा. औताडे यांचे हे संशोधन हरित ऊर्जा उत्पादनासाठी उपयुक्त ठरणार असून, औद्योगिक क्षेत्र, वाहन क्षेत्र, वीज संवर्धन, स्मार्ट डिव्हायसेस आदी क्षेत्रांत त्याचा प्रभावी उपयोग होऊ शकतो.
त्यांच्या या यशाबद्दल फॅबटेक एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष मा.श्री.भाऊसाहेब रुपनर, सचिव डॉ.अमित रुपनर, कार्यकारी संचालक मा.श्री.दिनेश रूपनर, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ .संजय अदाटे, प्राचार्य डॉ. रवींद्र शेंडगे, उप प्राचार्य प्रा.डॉ विद्याराणी क्षीरसागर, सर्व विभागप्रमुख व सहकारी प्राध्यापकांनी प्रा. औताडे यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या या यशामुळे फॅबटेक टेक्निकल कॅम्पसचा नावलौकिक अधिक वृद्धिंगत झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button