महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक व दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत सावे माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवी मधील विद्यार्थिनी कुमारी पुनम बाबासो बंडगर हिने सोलापूर जिल्ह्यातून एन टी सी प्रवर्गातून शिष्यवृत्तीस पात्र ठरली आहे. तिला पुढील पाच वर्षे प्रतिवर्ष बारा हजार रुपये प्रमाणे 60000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
तिच्या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री अर्जुन शेळके सर यांनी शिष्यवृत्ती पात्र पूनम बंडगर व तिचे पालक तंटामुक्त अध्यक्ष श्री. बाबासो बंडगर यांचा सत्कार फेटा, शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयातील सहशिक्षक श्री गावडे सर व बर्गे सर यांनी मनोगत व्यक्त केले.
या यशाबद्दल संस्थेचे संस्था अध्यक्ष श्री. वसंत शेंडगे ,सचिव मुरलीधर इमडे ,खजिनदार श्री दिलीप सरगर ,संचालक दिलीप शेंडगे ,विठ्ठल सरगर व गंगाराम इमडे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शेळके सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व समस्त ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी विद्यार्थिनी व समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.