सांगोला : फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (ऑटोनॉमस) सांगोला येथे ‘ऋणानुबंध’ या संकल्पनेखाली माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या विशेष दिवशी विविध बॅचेसमधील १०० हून अधिक माजी विद्यार्थी एकत्र आले आणि कॉलेजमधील आठवणींना उजाळा दिला , अशी माहिती विद्यार्थी प्रमुख आणि माजी विद्यार्थी संबंध प्रमुख डॉ.संजय पवार यांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती वंदनेने झाली. कॉलेजचे संचालक, प्राचार्य आणि विविध विभाग प्रमुखांनी उपस्थितांचे स्वागत केले. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवांचे मनमोकळेपणाने दर्शन घडवले आणि त्यांनी कॉलेजच्या प्रगतीबद्दल अभिमान व्यक्त केला.
यावेळी ‘माजी विद्यार्थी असोसिएशन’च्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली त्यामध्ये सन २०२५ चे प्रतिष्ठित माजी विद्यार्थी म्हणून २०१४-२०१५ मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील श्री. सचिन जावीर (निरीक्षक – मापनशास्त्र आणि गुणवत्ता नियंत्रण, महाराष्ट्र शासन ) आणि २०१८-२०१९ चा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील श्री. सुरज दिवसे (प्रोजेक्ट इंजीनियर -प्रोझील ग्रीन एनर्जी लिमिटेड ) यांची निवड करण्यात आली आणि भविष्यातील उपक्रमांची आखणी झाली.
कार्यक्रमाच्या शेवटी माजी विद्यार्थ्यांना भेट वस्तू देण्यात आल्या ., ‘ऋणानुबंध’ हा मेळावा केवळ भेटीगाठींचाच नव्हता, तर जुन्या काळातील भावना आणि बंध पुन्हा जिवंत करणारा एक अनमोल अनुभव ठरला.
हा कार्यक्रम फॅबटेक एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, सचिव डॉ.अमित रुपनर, कार्यकारी संचालक मा.श्री.दिनेश रूपनर, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर यांच्या मागर्दर्शनाखाली व फॅबटेक एज्युकेशन सोसायटी चे उपाध्यक्ष मा.श्री.भाऊसाहेब रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ .संजय अदाटे, प्राचार्य डॉ. रवींद्र शेंडगे, उप प्राचार्य प्रा.डॉ विद्याराणी क्षीरसागर, डीन स्टुडंट डॉ.संजय पवार व सर्व विभागप्रमुख यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.