रोटरी क्लब सांगोला यांची कोकण दर्शन सहल संपन्न.

रोटरी क्लब सांगोला च्या सभासदांनी कोकण दर्शन ही सहर शनिवार व रविवार या दोन दिवशी केली. त्यामध्ये कोल्हापूर, रत्नागिरी, गणपतीपुळे व मारलेश्वर अशा देवस्थानांबरोबरच गड किल्ले तसेच निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतला.
दोन दिवस मनसोक्त आनंद घेणे. या मूळ उद्देशाने रोटरी क्लब सांगोलाच्या सभासदांनी या सहलीचे आयोजन केले होते. त्यामध्ये रोटरीचे 20 सभासद सहभागी झाले होते. या सहलीतला अनुभव म्हणजे रो. मोहन मस्के हे म्हणाले की, या सहा – सात वर्षांमध्ये मी इतक्या पायऱ्या चढलो नव्हतो. त्यांनी मारलेश्वरच्या चारशे पायऱ्या चढल्या व उतरल्या अशाप्रकारे सर्वांना सामावून घेऊन या सहलीमध्ये सर्वांनी मनमुराद आनंद घेतला.
 रोटरी क्लब ने कुबड्या बरोबर घेतल्या होत्या. देवस्थानच्या ठिकाणी असे अपंग भिकारी असतील तर त्यांना कुबड्या देण्याचे काम करणार होते.परंतु या ठिकाणी एकही असा अपंग मिळाला नाही तसेच सर्वत्र देवस्थानची व्यवस्था सुंदर झालेली आहे.असे पहावयास मिळाले.
 कारण त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम घेण्याचा मानस सुद्धा रोटीचा होता. परंतु असा कोणताही कार्यक्रम करता आला नाही. मात्र सहलीचा आनंद सर्वांनी लुटला.अधून मधून अशा प्रकारे मनोरंजनाची आवश्यकता आहे असे सर्वांचे मत झाले. अशाप्रकारे कोकण दर्शन सहल संपन्न झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button