सांगोला तालुका

नेटबॉल स्पर्धेत नाझरा विद्यामंदिर प्रशालेचा संघ जिल्ह्यात प्रथम

नाझरा(वार्ताहर):- सोलापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये नाझरा विद्यामंदिर प्रशालेतील 14  व 17 वर्षाखालील मुलांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला तर 14 व 17 वर्षाखालील मुलींनी जिल्ह्यात द्वितीय क्रमांक फटकावला.प्रथम क्रमांकाने विजय संघाचे पुणे येथे होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या खेळाडूंना क्रीडाशिक्षक चारुदत्त जगताप यांचे मार्गदर्शन लाभले.सर्व विजयी व उपविजयी संघाचे अभिनंदन सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके,सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्था कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके, प्राचार्य अमोल गायकवाड,पर्यवेक्षक मधुकर धायगुडे यांच्यासह सर्व शिक्षकांनी,पालकांनी केले. व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!