सांगोला तालुका

जि प सांगोलकर गवळीवस्ती (तरंगेवाडी) शाळेत विद्यार्थ्यांनी भरविला आठवडी बाजार

सांगोला: (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाची ओळख व्हावी त्याचबरोबर आपल्या परिसरातील पालेभाज्या, फळे, खाद्यपदार्थ यांची विक्री करता यावी तसेच आई-वडील कष्ट करून मिळवत असलेल्या पैशाची किंमत कळावी या उद्देशाने बुधवारी जि. प. प्राथमिक शाळा सांगोलकर गवळीवस्ती (तरंगेवाडी) शाळेत आठवडी बाजार भरवण्यात आला होता.
आठवडे बाजारात 65 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन त्यांनी पालेभाज्या, फळे, भेळ, चहा स्टॉल, वडापाव, किराणामाल यासारखे अनेक गरजू वस्तू विद्यार्थ्याने विकण्यास आणले होते. बाजारात विद्यार्थ्याने विक्रीसाठी आणलेल्या वस्तू पालक, गावातील नागरिक व शिक्षकाने खरेदी करून विद्यार्थ्यांना भविष्यात उद्योजक व व्यवसाय करण्याच्या दृष्टीने प्रेरणा व प्रोत्साहन दिले.
बाजारात सर्वाधिक माल विकून नफा कमवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे नम्रता गावडे, स्वीटी गावडे व प्राजक्ता गावडे यांना मिळाला. आजच्या आठवडी बाजाराला मुख्याध्यापक सुहास कुलकर्णी, शिक्षक सुशांत शिंत्रे, गणेश व्हनंखंडे श्रीमंत गावडे व खुशालदिन शेख यांनी नियोजन केले होते. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात पालक व परिसरातील नागरिक उपस्थित होते

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!