महाराष्ट्र

चौगुले सायन्स क्लासेस सांगोलामध्ये जागतिक हिवताप दिनानिमित्त व्याख्यान संपन्न

सांगोला प्रतिनिधी :-  चौगुले सायन्स क्लासेस सांगोला येथे जागतिक हिवताप दिनानिमित्त मार्गदर्शन पर व्याख्यान संपन्न झाले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. श्री. सतीश राऊत (प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र अकोला) तसेच आरोग्य निरीक्षक दीपक गुळवे हे उपस्थित होते. चौगुले सायन्स क्लासेस चे संचालक प्रा. संजय चौगुले सर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
  प्रसंगी बोलताना श्री सतीश राऊत यांनी जागतिक हिवताप दिनाची पार्श्वभूमी समजावून दिली. हिवताप मुळे झालेला मृत्यूची आकडेवारी सांगितली. हिवताप का व कशामुळे होतो याची कारणे सांगितली. ॲनाफिलस या डासामुळे होणाऱ्या या आजाराची व्याप्ती व परिणाम विशद केले, डासाची पैदास कशी होते हे सविस्तर सांगितले.
   हिवताप व  टी.बी. या आजारांबद्दल ही सविस्तर विश्लेषण केले प्रसंगी कोणते उपाय  करावेत हे समजावले. भारतीय तिरंग्याच्या तीन रंगांचे व संबंधित आहाराचे महत्त्व पटवून दिले.   याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना हिवताप निर्मूलनासाठी शपथ देण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संजय चौगुले सर यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. मल्हारी बनसोडे सर यांनी केले तर आभार कृष्णा घुंबरे सर यांनी मानले. या प्रसंगी प्रा. विकास घाडगे तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button