महाराष्ट्र

नाझरे येथे श्री स्वामी ची पुण्यतिथी साजरी..

दिगंबरा दिगंबरा… श्रीपाद वल्लभ दिगंबरा… श्री अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त… सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय…. श्री क्षेत्र अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय या जयघोषणात नाझरे ता. सांगोला येथे स्वामीभक्त माणिक स्वामी व प्रकाश परिचारक यांच्या घरी श्री स्वामींची पुण्यतिथी मोठ्या भक्ती भावाने साजरी करण्यात आली.

याप्रसंगी बलवडी, नाझरे येथील भजनी मंडळाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर नामस्मरण, दुपारी साडेबारा वाजता पुष्पांजली करण्यात आली. यावेळी शिवानंद स्वामी, सौ. रोहिणी स्वामी, प्रतीक परिचारक, लिंग या स्वामी, सोनाली स्वामी यांच्या शुभहस्ते महास्वामीची महाआरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button