महाराष्ट्र

सांगोला विद्यामंदिरमध्ये 2 मे पासून वासंतिक वर्गाचे आयोजन

सांगोला (वार्ताहर) सांगोला विद्यामंदिर प्रशालेमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता इयत्ता पाचवीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांसाठी वासंतिक वर्गाचे आयोजन करण्यात आले असून याची सुरुवात शुक्रवार, दिनांक 2 मे, 2025 पासून सकाळी 8:00 ते 10:15 या वेळेत होणार असल्याची माहिती प्राचार्य अमोल गायकवाड यांनी दिली.

इयत्ता पाचवीच्या नवागत विद्यार्थ्यांना शालेय परिसराची ओळख व्हावी याकरिता वेलकम सेरेमनी, खाऊ वाटप, त्यांच्यामध्ये मराठी-इंग्रजी-गणिताचे प्रारंभिक ज्ञान, संगणकाची ओळख, योगासने-कवायत प्रकार, नवनवीन खेळ, चित्र रेखाटन, रंगभरण, अक्षरलेखन, विविध विषयांवर माहितीपर व्याख्याने, सहल, विविध गुणदर्शनद्वारे नृत्यकला, नाट्यकला यासारख्या उपक्रमांनी हे वासंतिक वर्ग समृद्धपणे 22 मे 2025 पर्यंत चालवण्यात येणार असून इयत्ता चौथी उत्तीर्ण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवून आनंद घ्यावा असे आवाहनही याद्वारे करण्यात आले आहे.

 

—————————————————

शैक्षणिक गुणवत्तेत जिल्ह्यात अव्वल असणारी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला, सांगोला ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत तालुक्यातील अग्रगण्य शाळा स्पर्धा परीक्षांच्या निकालातून कायमच विद्यार्थ्यांचे व पालकांचे आकर्षण केंद्र ठरली आहे. या दृष्टीने पालकांनी लवकरात लवकर आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा आणि आपल्या पाल्याच्या भविष्याबद्दल निश्चिंत व्हावे -प्राचार्य अमोल गायकवाड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button