महाराष्ट्र
नाझरा विद्यामंदिर प्रशालेत महात्मा बसवेश्वर जयंती साजरी

*नाझरा(वार्ताहर):- नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य बिभिषण माने यांनी केले, गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन पर्यवेक्षक मधुकर धायगुडे यांनी केले.
या कार्यक्रमास इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका मंगल पाटील,ज्येष्ठ शिक्षक विनायक पाटील, प्रा. नारायण पाटील,प्रा. महेश विभुते यांच्यासह प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.यावेळी प्रशालेतील शिक्षक दीपक शिंदे यांनी महात्मा बसवेश्वरांचा जीवन परिचय करून दिला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महालिंग पाटील यांनी केले.



