महाराष्ट्र

सांगोला विद्यामंदिरमध्ये वासंतिक वर्गाचे उद्घाटन उत्साहात*

सांगोला (वार्ताहर) सांगोला विद्यामंदिर प्रशालेमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये इयत्ता पाचवी नवागत विद्यार्थ्यांसाठी वासंतिक वर्गाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले.

कार्यक्रम प्रारंभी सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन व संस्थापक अध्यक्ष, गुरुवर्य कै.चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पालक व विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापिका सौ.शाहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक सुरेश मस्तुद, मच्छिंद्र इंगोले, प्रदीप धुकटे उपस्थित होते.

प्राचार्य अमोल गायकवाड यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांचे सांगोला विद्यामंदिर प्रशालेमध्ये नव्याने प्रवेश घेतल्याबद्दल अभिनंदन करत स्वागत केले. मोठमोठ्या शहरांमध्ये आयोजित ‘समर कॅम्प’च्या धरतीवर हे वासंतिक वर्ग इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे नि:शुल्क असणार असून यामधून विद्यार्थ्यांचा शालेय तसेच इतर उपक्रमांमधून व्यक्तिमत्व विकास साधला जाणार आहे. वासंतिक वर्गाच्या पूर्ण कालावधीसाठी सांगोला शहर व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी बस सेवा मोफत राहणार असून पहिल्याच दिवशी मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी यावेळी विद्यार्थी व पालकांना धन्यवाद दिले.

चौकट

*विद्यार्थ्यांचे स्वागत चॉकलेट्स वाटून करण्यात आले. मोटू-पतलू या कार्टूनरुपी व्यक्तिरेखांनी केलेल्या गमती-जमतीमुळे विद्यार्थी आनंदित झाले. बलून्स डेकोरेशन व सेल्फी पॉईंटवर विद्यार्थ्यांनी मनमुराद फोटोग्राफी केली. याप्रसंगी पालकांना सुद्धा सेल्फीचा मोह आवरता आला नाही. मोटू-पतलू सोबत विद्यार्थ्यांनी डीजेच्या विविध गाण्यांवर नृत्याचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. पालकांना चहापान करण्यात आले.*

सकाळी 8:00 ते 10:20 या वेळेत हे वासंतिक वर्ग 22 मे, 2025 अखेर सुरू राहणार असून त्यांच्या कार्यवाही विषयी थोडक्यात माहिती देत विद्यार्थ्यांना शालेय परिसराची ओळख व शिस्त विषयक सूचना वैभव कोठावळे यांनी दिल्या.

आभार काकासाहेब नरुटे यांनी मानले. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नरेंद्र होनराव यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button