महाराष्ट्र
सांगोला: अपघातात शाळकरी मुलाचा मृत्यू
ट्रक आणि मोटारसायकलची धडक झाल्याने मोटारसायकलवरील शाळकरी मुलगा ठार झाल्याची घटना शनिवार दि. ३० रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास सांगोला – पंढरपूर रोडवरील बाह्यवळण येथे घडली. अमर भगवंत दिघे (वय १७, रा. वाढेगांव, ता. सांगोला) असे मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे.
अमर दिघे हा सांगोला येथील शाळेत इयत्ता १० वी च्या वर्गात शिकत होता. शनिवारी तो आपल्या गावाकडे जात असताना सांगोला – पंढरपूर रोडवरील सोलापूर – रत्नागिरी बाह्यवळणाजवळ त्याच्या मोटारसायकलची ट्रकबरोबर धडक झाली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. तात्काळ त्याला १०८ सेवेतील रूग्णवाहिनेतून उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. याबाबतची नोंद सांगोला पोलिसात करण्यात आली आहे.



