महाराष्ट्र

पायोनीयर स्कूल य.मंगेवाडीला “ग्लोबल स्कूल अवॉर्ड ” देऊन सन्मान* 

खंडोबा बहुउद्देशीय संस्था संचलित ‘पायोनियर शैक्षणिक संकुल’ मधील विद्यार्थ्यांना रांगोत्सव सेलेब्रेशन आर्ट कॉम्पिटिशन मध्ये उत्तम असे यश मिळाले आहे.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. संभाजी पाटील,पायोनियर शैक्षणिक संकुलाचे चे संस्थापक श्री. अनिल येलपले सर,पायोनियर संकुलाच्या सचिव सौं.मनीषा येलपले मॅडम,पायोनियर पब्लिक स्कूल चे प्राचार्य श्री. सतीश देवमारे सर व पायोनियर निवासी गुरुकुल चे प्राचार्य डॉ.अमोल रणदिवे सर तर सर्व एच. ओ. डी. रुपनर सर,बाबर सर, राऊत मॅडम व येलपले मॅडम त्याचबरोबर सांस्कृतिक प्रमुख परवीन मॅडम, क्रीडा शिक्षक वाघमारे सर आणि माळी सर  उपस्थित होते.

रंगोत्सव स्पर्धेच्या दुसऱ्या राऊंड चा निकाल शंभर टक्के लागला. यामध्ये संग्राम रामेश्वर बागल, तनिष्का तानाजी केंगार, रिया विश्वास शितोळे, प्रतिक निलेश झोरे, स्वराली प्रमोद घाटूळे, ऐश्वर्य विशाल चौगुले,समर्थ बाबासाहेब खुळे,स्वयंम सुरेश करमुडे. या विद्यार्थ्यांना ए ग्रेड मिळाली व प्रशस्ती पत्रक व ट्रॉफी तसेच सरप्राइज गिफ्ट मिळाले .तसेच अबोली योगेश लाडे, विशाल संतोष आसबे, मयुरी प्रकाश येलपले, मयुरी महादेव मेखले, स्वाती दुर्योधन खंडागळे, आदित्य रमेश नसले, समर्थ छगन येलपले, कृष्णा अजित येलपले, प्रज्योत अमोल रणदिवे, धनश्री लक्ष्मण खरात, अनुष्का अनिल विटेकर, साक्षी रणजित पाटील, अनन्या हणमंत येलपले, तनिष्का लक्ष्मण विभुते, प्रतिक निलेश झोरे, अक्षदा चंद्रकांत चौगुले या विदयार्थ्यांना बी ग्रेड मिळाली असून त्यांना इंटरनॅशनल मेडल व प्रशस्ती पत्रक मिळाले. पियुष चंद्रकांत कोळवले, वैशाली रवी लवटे व श्रेया सचिन तंडे या विद्यार्थ्यांना सरप्राईस गिफ्ट मिळाले.तसेच विद्यार्थ्यांना स्मार्ट बोट वॉच,एल. सी. डी रायटिंग पॅड, टिफिन व जी  शेपड लॅम्प अशी विशेष बक्षिसे मिळाली.

पायोनियर स्कूल ला ग्लोबल स्कूल अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.पायोनियर स्कूल चे प्राचार्य अनिल येलपले सर यांना विशेष बक्षीस व प्रशस्ती पत्र मिळाले. तसेच ही  स्पर्धा ज्यांनी राबवली ते कला शिक्षक सौं. ज्योती रणदिवे मॅडम व अमोल रणदिवे सर यांना स्मार्ट बोट  वॉच व प्रशस्तीपत्रक  मिळाले.

ही स्पर्धा पायोनियर संकुल मध्ये घेण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी तसेच कर्मचाऱ्यांनी खुप मेहनत घेतली. संकुलातील या विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष श्री.अनिल येलपले सर यांनी खुप कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा दिल्या.  कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पायोनियर पब्लिक स्कूलच्या मृणाल राऊत  मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन सोमनाथ आदलिंगे सर यांनी केले. महाराष्ट्र दिनाच्या या निसर्गरम्य वातावरणात हा बक्षीस वितरण सोहळा अतिशय आनंदात पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button