कोळा विद्यामंदिर हायस्कूलमधील ‘इयत्ता पाचवीच्या’ विद्यार्थ्यांचा चावडी वाचन कार्यक्रम ‘ संपन्न.

कोळा( वार्ताहर)महाराष्ट्र शासन उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविणेबाबत महाराष्ट्र शासनाने आदेश दिले होते. त्यानुसार वर्गातील विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वृद्धिंगत करण्याकरिता निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत दिनांक 1 मे 2025 रोजी कोळे ग्रामपंचायत कार्यालय कोळे या ठिकाणी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी चावडी वाचन व गणन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यामध्ये प्रशालेतील इयत्ता पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊन शालेय व्यवस्थापन समितीमधील सदस्य, ग्रामपंचायत कार्यालयातील अधिकारी, सदस्य तसेच गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत वाचन व गणन घेण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन चांगल्या प्रकारे वाचन व संख्यांची आकडेमोड केली. विद्यार्थ्यांनी केलेल्या वाचनावर उपस्थित मान्यवर तसेच पालकांनी चांगला अभिप्राय दिला व प्रशालेचे आणि सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमात प्रशालेतील कांबळे एन.डी सर, उजनीकर सर, निसाळ सर व कांबळे सर तसेच कोळे गावातील पत्रकार उपस्थित होते.



